सहकार क्षेत्रासाठीचे कार्य उल्लेखनीय : आ. सत्तार

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : व्यवस्थापक दत्तात्रय कदम यांनी सहकार क्षेत्रासाठी केलेले कार्य उल्लेखनीय असुन, ते सेवानिवृत्त झाले असले तरी आमच्या परिवारात सदस्य असल्याचे आ. सत्तार यांनी बोलताना सांगितले.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा भराडीचे व्यवस्थापक दत्तात्रय कदम हे सेवानिवृत्त झाले. आ. अब्दुल सत्तार व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा भराडी येथे वर्षांपासून शाखा व्यवस्थापक म्हणुन दत्तात्रय कदम कार्यरत होते. वयोमानानुसार ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन सिल्लोड येथे करण्यात आले. 

आ. अब्दुल सत्तार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे यांच्या प्रमुख उपस्थितीत कदम यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांचे नातेवाईक, हितचिंतक आदिंच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी सभापती अशोक गरुड, उपसरपंच गजानन महाजन, सुनिल सुसुंद्रे, सदाशिव खोमणे प्रकाश महाजन, विष्णु महाजन, चेअरमन प्रभाकर वाघ, केद्र प्रमुख राजु महाजन, मुख्याध्यापक दिपक सोनवणे, विलास जाधव, राजेंद्र चव्हाण, संजय पाटील, गणेश शेळके, जगदिश शिमरे बँकेचे अधिकारी साहेबराव डकले, भगवान गायकवाड, रमेश तायडे, शैलेश राजपुत, शिवाजी मोरे, शिवाजी पाटिल, राजकुमार इंगळे, विनायक ठेंग, सुभाष काकडे, उदय चोबे, काकडे, देविदास मिरगे, रिजवान पठाण सह आदिंची उपस्थिती होती.